हवामान :
उष्ण व दमट हवामान असलेल्या तसेच उष्ण व कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते.
लागवड कालावधी : एप्रिल ते जूनचा पहिला पंधरवाडा ( ३० ते ३५ डिग्री सेल्सियस उगवणीस उत्तम )
वाढीच्या कालावधीत २० ते ३० डिग्री सेल्सियस व २५ ते ४० % पर्यंत सावलीच्या ठिकाणी पिकाची वाढ जोमाने होते
निचऱ्याची, मध्यम प्रतीची, भुसभशीत कसदार असावी.
जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढीसाठी उत्तम.
जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढीसाठी भरपूर शेणखत, कंपोस्ट किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.
जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनाचे ड्रीपर निवडावे.
जमीन हलकी असली तरी ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थपन महत्वाचे आहे.
वरदा,महिमा,रीजाथा ,माहिम
आले : रिओ – डी -जानिरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.
सुंठनिर्मितीसाठी : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड,कुरूप्पमपाडी.
तेल : स्लिवा स्थानिक, नरसापटलाम, एरनाड, चेरनाड, हिमाचल प्रदेश.
जास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ – डी – जानिरिओ.
एप्रिल ते जूनच्या पहिल्या पंधरवड्या पर्यंत करावी.
उशिरा लागवडीमुळे कंदमाशी व कंद कूज यांचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होतो.
लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी.
लागवडीला कंदाचे वजन २५ ते ५० ग्रॅम असावे.
२.५ ते ५ सेंमी लांब असावे व बियाणे सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले .
एकरी १० क्विंटल बियाणे लागते.
प्रक्रिया केलेले कंद ४ ते ५ सेंमी खोल लावावा.
जीवाणू खत | कार्य |
अझोटोबॅक्टर | नत्र स्थिरीकरीण करणारे जिवाणू |
पीएसबी | स्फुरद विघटन करणारे जिवाणू |
केएसबी | पालाश विघटन करणारे जिवाणू |
मायकोरायझा | स्फुरद व इतर आवश्यक अन्नघटक शोषून घेणारे जिवाणू |
2)सूक्ष्म पोषक खते:
3) द्रवरूप खताचा वापर : फवारणी आणि ठिबक:
आले पिकाला पारंपरिक पाट पाणी पद्धतीने पूर्ण पिकाच्या कार्यकाळात (200 दिवस) १३०० ते १५०० mm पाण्याची आवश्यकता असते.
आले पिकातील कीड नियंत्रण:
कंद माशी Rhizome Fly
माशी डासासारखी पण आकाराने मोठी काळसर रंगाची असते. अळ्या उघड्या गड्ड्यांमध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात.
नियंत्रण :
क्विनॉलफॉस (२५% EC ) २ मिली / लिटर पाणी किंवा डायमिथोएट १.५ मिली / लिटर पाणी मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान आलटून पालटून १२ ते १५ दिवसाच्या अंतराने फवारावे.
फोरेट (१०%) एकरी ५ ते १० किलो बुंध्यांपाशी टाकावे.
सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये आवश्यकतेनुसार फवारणी घ्यावी अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये.
पाने गुंडाळणारी अळी:
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर २ ऱ्या आठवड्यापर्यंत प्रादुर्भाव दिसतो.
अळी हिरवट रंगाची असून, अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पण गुंडाळून घेते.
आतील बाजूने पान खाण्यास सुरुवात करते.
नियंत्रण:
क्लोरोपायरीफॉस १ ते २ मिली / लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खोड पोखरणारी अळी:
जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भाव दिसून येतो.
अळी छोट्या खोडाला छिद्र करून आतून खाऊन उपजीविका करते त्यामुळे खोड पिवळे पडून वाळते .
अळी छिद्रातून जाळीदार बारीक गोळ्यांन मध्ये विस्टा बाहेर टाकते.
नियंत्रण:
मेल्याथिऑन २ मिली / लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सूत्रकृमी :
मुळातील रस शोषण करतात.
पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात.
सूत्रकृमींनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या मर रोग बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
नियंत्रण:
चांगली मशागत करावी.
शेणखत अर्धवट कुजलेले (३ ते ४ महिन्याचे) वापरावे.
वर्षभर कुजलेल्या शेणातून सूत्रकृमींचा प्रादुर्भाव वाढतो .
शेणखतातून गंधक भुकटी (२५ किलो / एकर ) व निंबोळी पेंड (५०० किलो / एकरी) वापरावे.
हुमणी :
पिकास नुकसान करणारी अळी अवस्था जुलै पासून मार्च पर्यंत असतो.
प्रादुर्भाव वाढल्यास ७५% पर्यंत पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
मे व जून महिन्यात अंडी अवस्था जमिनीत असते.
जुलै महिन्यात अळी अंड्यातून बाहेर येऊन मुळ्या व लहान कंद खाते.
प्राथमिक लक्षणात पाने पिवळी पडतात. माती उकरून शहानिशा करावी व उपचार लागलीच करावे.
नियंत्रण:
लागवडीनंतर जैविक कीटकनाशक - बिव्हेरिया - १ लिटर + मेटारायझिम १ लिटर + निरसे दुध २ लिटर + गुळ १ किलो कोठारी ड्रीप इरिगेशन मधून सोडावे.
कंदकूज (गड्डे कुजव्या):
ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत दिसतो व वाढतो.
पानाचे शेंडे करपतात. कडांनी खालीपर्यंत वळत जातात.
खोड जमिनीलगत काळपट राखाडी दिसते. गड्डाही वरून काळा पडतो व निश्तेज दिसतो.
कंदकूज होण्याचे प्रमुख कारण : खोल खुरपण, सूत्रकृमी
कंदास प्रथम इजा होते त्यातून पिथियम, फ्युजॅरियम बुरश्या आत शिरतात.
नियंत्रण:
पावसाळ्यात पाणी साचू न देणे. चर काढून पुण्याला वाट करणे.
मेटॅलॅक्झिल (८ %) + मॅंकोझेब (६४%) बीजप्रक्रिया.
गंधक (द्रवरूप ) ठिबक सिंचनातून युरिया खता सोबत वापरावे.
ट्रायकोडर्मा चा वापर करावा.
पानावरील ठिपके:
रोगाची सुरुवात कोवळ्या पानावरुन परारून पूर्ण पानांवर पसरते.
पानांवर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.
नियंत्रण:
मॅंकोझेब २.५ ग्रॅम / लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अथवा १% बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी.
परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात.





No comments:
Post a Comment