जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते.
उत्पादनात प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो.
मध्यम, काळी, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी भुसभुशीत
आम्ल-विम्ल निर्देशांक ७ ते ८ असल्यास अशा जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते.
हळद पिकाच्या लागवडी पूर्वी १५ दिवस आधी जमीन नांगरून व कुळवाच्या पोळ्या घालून तयार करावी.
खोल नांगरट : आडवी व उभी
कुळवाच्या पोळ्या : २ ते ३ (आवश्यकतेनुसार)
मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते.
तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणार्या निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते.
थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.
साधारणपणे हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जून महिन्याचे मध्यापर्यंत केली जाते.
हळदीचे प्रकार व जाती:
- खाण्याची हळद (Curcuma Longa )
- कस्तुरी किंवा रान हळद ( Cucuma Caesia)
- आंबे हळद (Curcuma Amada)
- काळी हळद (Curcuma Caesia)
- सेलम
- कृष्णा (कडाप्पा )
- राजापुरी
- फुले स्वरूप (Cucuma longa
- पोट्यँगी
- एसीसी-३६१
- प्रभा
- प्रतिभा
लागवडीचा हंगाम आणि लागवड :
हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
लागवडीसाठी वापरले जाणार्या बियाणांची सुप्तावस्थ संपलेली असावी.
बियाणाचे डोळे नकळत फुगलेले असावेत.
कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये.
लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालतात.
मात्र हळकुंड बियाणे ३० ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे असावेत.
बेणे निवडतांना चांगले वाढलेले व रोगमुक्त असे गड्डे, अंगठा गड्डे व लेकुरवाळे कंद इ. निवड करावी.
अ.क्र. | कीटकनाशक व बुरशीनाशक | प्रमाण (१०० लिटर पाणी ) |
१ | २५ % क्विनालफोस किंवा ३० % डायमेथोएट
| २०० मिली १०० मिली |
२ | ५० % कार्बेन्डाझिम किंवा
डायथेन एम ४५ | २५० ग्राम ३०० ग्राम |

No comments:
Post a Comment