हवामान :
संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते.
या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान चांगल मानवून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते.
जमीन :
मध्यम काळी १ ते १.५ मीटर खोलीची जमीन, त्याखाली पाण्याचा निचरा होईल असा माती मिश्रित मुरूम अथवा थोडी चुनखडी किंवा मातीचा थर असलेली व जमिनीचा सामू (pH) ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो. अशा जमिनी लागवडीस उत्तम.
डोळा भरून तयार केलेल्या कलामांपासून संत्र्याची लागवड केली जाते.
कलमांची निवड करतांना ती शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली निरोगी, जातिवंत, जोमदार, वाढणारी, जम्बेरी, किंवा रंगपूर लिंबू या खुंटावर डोळे भरलेली असावीत.
2 X 2 X 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन चौरस पद्धतीने लागवड करावी. लागवडीपूर्वी एक महिना अगोदर खड्डे खोदावेत.
खड्यात अर्धवट कुजलेले २५ किलो शेणखत, २ किलो निंबोळी पेंड, १ ते २ किलो राख, २५ ग्रॅम ट्रॅकोडर्मा पावसाळ्यापूर्वी टाकावे.
कलमे मुख्यत्वे करून संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तापूर्वी आकाश ढगाळलेले असताना व खड्डयात पुरेशी ओल असताना लावावीत.
कलमांचा डोळा पश्चिम किंवा दक्षिणेला ठेवावा. यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे डोळा खचण्याचा संभाव नसतो.
लागवडीचे अंतर | रोपांची संख्या |
6 X 6 | 112 |
5 X 5 | 162 |
संत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन :
डिंक्या (gummosis)
डिंक्या हा बुरशीजन्य रोग असून या रोगात झाडाच्या सालीतून डिंकासारखा पदार्थ ओघळताना दिसतो.
व्यवस्थापन
(१) संत्रा पिकाला ठिबक सिंचनाने ओलित करावे. संत्रा झाडाच्या बुंध्यावर बोर्ड मलम (Bordo paste) १:१:१० दोन वेळा म्हणजे पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात व पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात लावावा.
Citrus Canker:
लिंबू, गोड संत्री आणि मंडारिन्सवर या पिकावर हा रोग असतो
रोगाची सुरुवात लहान मुरुमांसारख्या ठिपक्यांपासून होते, आणि रंग पिवळा असतो.
जसजसे डाग मोठे होतात तसतसे ते तपकिरी, मध्यभागी आणि वरच्या कडांसह कमजोर होतो.
बर्याचदा या प्रत्येक डागांच्या सभोवताली पिवळा गोल असतो.
व्यवस्थापन :
स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट 500-1000 पीपीएम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 0.2% पंधरवड्याच्या अंतराने फवारणी करा.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी संसर्ग झालेल्या फांद्यांची छाटणी करा
शेंडे मर :
या रोगात संत्र्याच्या कोवळ्या तसेच पक्व हिरव्या फांद्या खांद्या शेंड्यापासून खाली वाळतात व त्यामुळे फाद्यावरील पाने पिवळी पडतात व गळतात.
व्यवस्थापन :
या रोगाच्या व्यवस्थापनासाठी झाडावरील रोगट वाळलेल्या फांद्या म्हणजे सल पावसाळ्यापूर्वी काढून जाळून टाकाव्यात.
खोड कुज व मूळकूज :
हा प्रादुर्भाव खोडावर व मुळावर पसरतो. या रोगात झाडाची मुळे कुजतात व बुंधाची साल कुजते.
मोठ्या मुळ्या कुजण्याचे प्रमाण हळूहळू दिसू लागते अशावेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.
व्यवस्थापन :
१) या रोगाच्या व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात व सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात.
(२) वरील उपायोजना झाल्यानंतर Cymoxanil 8 % + Mancozeb 64 % WP हे मिश्रण बुरशीनाशक 25 ग्रॅम अधिक 50 मिली जवस तेल अधिक दहा लिटर पाण्यात घेऊन आळवणी करावी व मातीने वाफा झाकून घ्यावा.
कोळशी :
संत्रा पिकावरील काळ्या पांढर्या माशी पानातील रस शोषण केल्यावर आपल्या शरीरामधून चिकट स्त्राव बाहेर टाकते.
या चिकट द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते, यालाच कोळशी असे म्हणतात.उष्ण व दमट हवामानात प्रादुर्भाव जास्त आढळतो. प्रादुर्भाव झाल्यास पाने फांद्या फळे व संपूर्ण झाड काळे पडते.
व्यवस्थापन :
या रोगासाठी कारणीभूत असलेली काळी पांढरी माशी या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
निंबोळी तेल 100 मिली/दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन संत्र्याच्या झाडाला मृग, हस्त आणि आंबिया बहराचा नवतीचा कालावधी लक्षात घेऊन पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी पुन्हा एक फवारणी घ्यावी.
Tristiza Citrus Virus :
ट्रिस्टेझा ची लागण झालेली झाडे,पाची वाढ होत नाही आणि पानगळ होता. रोगाची लागण झालेल्या झाडावर लहान फळे येतात. कारण कळ्या एकत्र येण्यामुळे स्टार्च मुळांपर्यंत पोहोचत नाही. मुळे टोकापासून खोडापर्यंत मारतात.
व्यवस्थापन :
(१) रोगमुक्त रोपाची लागवड करावी व रोपे बंदिस्त मावा विरहीत रोपवाटिकेत तयार झाले याची खातर जमा करून घ्यावी
(२) रोपे तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या अवजाराचे सोडियम हायपोक्लोराईड च्या एक ते दोन टक्के द्रावणात निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
Citrus Greening :
हा जिवाणूजन्य रोग असून या रोगात प्राथमिक लक्षण म्हणजे प्रादुर्भाव झालेल्या पानावर चट्टे आढळतात. हे चटके पानाच्या दोन्ही बाजूस कमी-अधिक प्रमाणात दिसतात.पानाच्या खालच्या बाजूच्या शिरा फुगतात व त्यानंतर शिरांमध्ये पानाचा भाग पिवळा होण्यास सुरुवात होते.
व्यवस्थापन :
लागवडीसाठी रोगमुक्त कलमाचा वापर करावा.
रोगग्रस्त फांद्या तीस ते चाळीस सेंटीमीटर निरोगी फांदी सह कट कराव्यात.
प्रत्येक नवीन पालवी फुटण्याच्या वेळेस शिफारशीप्रमाणे व्यवस्थापन योजना अमलात आणून साइट्रस सिला या किडीचे व्यवस्थापन करावे.
काळी/ पांढरी माशी :
या किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी तेल १०० ते १२५ मिली / १० लिटर पाणि या प्रामनात फवारणी करावी.
संत्रा बागेत प्रामुख्याने तीन बाहेर घेतले जातात :
बहार | आंबे बहार | मृग बहार | हस्त बहार |
फुलोरा | जानेवारी - फेब्रुवारी | जून - जुलै | ऑक्टोबर - नोव्हेंबर |
फळ काढणी | नोव्हेंबर - डिसेम्बर | फेब्रुवारी – मार्च | जून - जुलै |
No comments:
Post a Comment